Ad will apear here
Next
आदिवासी महिलेकडे गावाचे नेतृत्व
अलका पवारनारूर (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एक आदिवासी महिला एका गावाची सरपंच झाली आहे. तीन ऑक्टोबरला अलका रमेश पवार यांची नारूर कर्याद नारूर (ता. कुडाळ) या गावाच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. त्यामुळे ऐतिहासिक ओळख असलेल्या या गावात इतिहास घडला आहे.

अलका पवार या कातकरी आदिवासी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वानरमारे समाजातील आहेत. जंगल पायथ्याशी मोलमजुरी करून त्या कुटुंबाचा गाडा हाकतात. गाव पॅनेलतर्फे त्या सरपंचपदासाठी रिंगणात होत्या. शिवसेनेतर्फे आणखी एका आदिवासी महिलेचा अर्ज दाखल झाला होता; मात्र तो छाननीत बाद ठरल्याने पवार बिनविरोध निवडल्या गेल्या.

नारूर कर्याद नारूर हे कुडाळ तालुक्यातील रांगणागडाच्या पायथ्याशी वसलेले गाव. या गावात कातकरी आदिवासी गुण्यागोविंदाने राहतात. या गावात सरकारने त्यांना पक्की घरे बांधून दिली आहेत. या वर्षी सरपंचपदाच्या आरक्षणात नारूरसाठी सरपंचपद आदिवासी महिलेसाठी राखीव होते. त्यामुळे, कायम गावकुसाबाहेर राहिलेल्या या वानरमारे आदिवासींना आरक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण गावाचे नेतृत्व करण्याची संधी चालून आली. या निवडणुकीसाठी गावाने बनविलेल्या ‘श्री देवी महालक्ष्मी, श्री देव खापरा, जयभवानी ग्रामविकास आघाडी’च्या वतीने ग्रामस्थांनी पवार यांची सरपंचपदाच्या उमेदवार म्हणून निवड केली.

शिवसेनेतर्फे अन्य एक महिला उमेदवार रिंगणात होती; मात्र छाननीमध्ये शिवसेना उमेदवाराचा अर्ज अवैध ठरल्याने गाव पॅनेलच्या पवार यांना बिनविरोध सरपंच म्हणून घोषित करण्यात आले. गाव पॅनेलच्या उमेदवाराला सरपंचपद मिळाल्याने नारूरवासीयांनी जल्लोष केलाच; पण त्याहीपेक्षा नारूरच्या आदिवासी बांधवांनी केलेला जल्लोष खूपच वेगळा होता. या वेळी उपस्थित प्रत्येक आदिवासीच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

गाव पॅनेलतर्फे पंचायत समितीचे माजी सदस्य व माजी सरपंच दीपक नारकर आणि या आदिवासींच्या उत्कर्षासाठी मोठी चळवळ उभी करणारे शोषित मुक्ती अभियानाचे अध्यक्ष उदय आईर यांनी पवार यांचे अभिनंदन केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZYKBH
 Nice
 Step In the right direction . Wish her a successful term . Merit deserves
luck .
 Very good info about this dreaded T2DB and hope this project helps.
Similar Posts
‘पुलं’चे कर्तृत्व हा राज्याचा सांस्कृतिक इतिहास कुडाळ : ‘‘पुलं’चे जीवन आणि कलाकर्तृत्व हा महाराष्ट्राचा अर्धशतकी सांस्कृतिक इतिहास आहे. लेखक, नट, नाटककार, संगीतकार, एकपात्री नट, पटकथाकार, संवादिनीवादक, निर्माता, संगीतकार, दशसहस्रेषु वक्ता आणि कर्णासारखा दाता मराठी मनाने केवळ ‘पुलं’मध्ये पाहिला,’ असे उद्गार ‘कोमसाप’च्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी काढले
५२वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन कुडाळला कुडाळ (सिंधुदुर्ग) : येथील वसुंधरा विज्ञान केंद्रातर्फे १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत ५२वे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
सिंधुदुर्गातील संगीत कलाकारांनी माहिती पाठविण्याचे आवाहन कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गायन आणि वादन क्षेत्रातील सर्व कलाकारांची सूची ‘स्वरसिंधुरत्न’तर्फे तयार केली जाणार आहे. त्यासाठी सिंधुदुर्गातील कलाकारांबरोबरच मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी असून, सध्या मुंबई, पुणे, कोल्हापूर किंवा इतरत्र राहणाऱ्या कलाकारांनीही ३० जून २०१९पर्यंत आपली माहिती पाठवावी,
सिंधुदुर्गातील ‘स्वररत्न’ शोधण्यासाठी अभंग, भक्तिगीत गायन स्पर्धा वालावल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) : वालावल येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिरात होणाऱ्या आषाढी एकादशी महोत्सवानिमित्त ‘स्वरसिंधुरत्न’ या अभंग, भक्तिगीत आणि सुगम संगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय, महाविद्यालयीन आणि प्रौढ अशा तीन वयोगटांमध्ये ही स्पर्धा होणार असून, प्रत्येक गटातील अंतिम

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language